नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

हद्दपारी आदेशाचा भंग करणाऱ्या संशयितावर शाहूपुरी पोलिसांची कारवाई

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी : संजय दिंडे

कोल्हापुर :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील हिस्ट्रीशीटर, सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर हद्दपारी व तडीपारीसारखी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने हद्दपारी आदेशाचा भंग करणाऱ्या संशयितावर कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण ऊर्फ पोलार्ड राजेश फाळके (वय २२ वर्षे) हा हद्दपारी आदेश असतानाही कनाननगर परिसरात गस्त घालताना पोलिसांना आढळून आला. त्याच्याकडे कनानगर, कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली असतानाही त्याने आदेशाचा भंग केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गु.र.नं. १०२/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके व त्यांच्या पथकाने केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:13 pm, September 20, 2026
34°C
छितरे हुए बादल
39 %
12 Km/h
Wind Gust: 11 Km/h
Clouds: 39%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!