नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मार्केट यार्डातील गोडाऊन फोडून कांदा, DVR व रोकड लंपास – १ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी- संजय दिंडे

कोल्हापूर :- शाहू मार्केट यार्डातील सिद्धेश्वर ट्रेडिंग कंपनीच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी ४० पोती लाल कांदा, सीसीटीव्हीचे DVR मशीन आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामचंद्र बाबुराव कात्रट (वय २९, कांदा-बटाटा व्यावसायिक, कोल्हापूर) यांच्या सिद्धेश्वर ट्रेडिंग कंपनीच्या शाहू मार्केट यार्ड परिसरातील गोडाऊनमध्ये ही चोरी झाली. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी गोडाऊन
मधून माल लंपास केला.
चोरट्यांनी ४० पोती लाल कांदा, प्रत्येकी सुमारे २ हजार ३३७ रुपये किमतीचा, असा ९३ हजार ५०० रुपयांचा कांदा चोरून नेला. त्याचबरोबर १२ हजार रुपये किमतीचे हाय व्हिजन कंपनीचे सीसीटीव्ही DVR मशीन तसेच ५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेली आहे. रोख रकमेमध्ये ५००, २००, १००, ५० आणि २० रुपयांच्या नोटांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद आहे.गोडाऊनमधील सीसीटीव्ही यंत्रणेचे DVRच चोरीला गेल्याने तपासात पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. मात्र, घटनास्थळी उपलब्ध असलेल्या इतर पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७०३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पोवार करीत असून गुन्हा पोलीस हेड कॉन्स्टेबल १४ रेडेकर यांनी दाखल केला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:16 pm, September 20, 2026
34°C
छितरे हुए बादल
40 %
9 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 44%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!