नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धुळ्यात बनावट तूपासह भेसळयुक्त मिठाईवर अन्न सुरक्षा विभागाचा छापा; ३.२६ लाखांचा साठा जप्त

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी संदीप अहिरे

धुळे: मा. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार धुळे जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या अनुषंगाने शहरात विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान विविध अन्न आस्थापनांवर छापे टाकून भेसळीच्या संशयावरून सुमारे ३ लाख २६ हजार रुपये किमतीचा अन्नधान्य व मिठाईचा साठा जप्त करण्यात आला आहे.

कारवाईचा तपशील:

  • मे. गायत्री ट्रेडर्स (कुमार नगर, साक्री रोड): या दुकानाची तपासणी करून गाईचे व म्हशीचे तूप या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. भेसळीच्या संशयावरून ४६३ किलो तूप (किंमत रु. ३,००,८००/-) जप्त करण्यात आले.
  • मे. रियल गृह उद्योग (कुमार नगर, साक्री रोड): या आस्थापनेची तपासणी करून बुंदी व बुंदीचे लाडू यांचे नमुने घेण्यात आले असून १५८ किलो साठा (किंमत रु. २५,२००/-) संशयावरून जप्त करण्यात आला.

​संकलित केलेले सर्व नमुने अधिकृत प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून, प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कायद्यानुसार पुढील कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

​सदर धडक कारवाई सहायक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांच्या पथकाने केली. नागरिकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण व भेसळमुक्त अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारची तपासणी सत्र यापुढेही सातत्याने सुरू राहील, असा इशारा अन्न सुरक्षा विभागाने दिला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:16 pm, September 20, 2026
34°C
छितरे हुए बादल
40 %
9 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 44%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!