🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी अकिल शहा
साक्री : भाडणे ता.साक्री जि. धुळे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘सेवा परमो धर्मः’ या उक्तीनुसार शासकीय मुलींची निवासी शाळा, भाडणे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या अभियानांतर्गत १७ सप्टेंबर रोजी विद्यार्थिनींनी भारताच्या नकाशाची मानवी रांगोळी साकारून देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व विविधतेत एकतेचा संदेश दिला. १८ सप्टेंबर रोजी ग्रामस्वच्छता अभियान राबवून विद्यार्थिनी व शिक्षकांनी गावातील रस्ते, परिसर व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली. कचरा संकलित करून योग्य विल्हेवाट लावण्यात आली तसेच ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
यासोबतच विद्यार्थिनींनी पाणी, फुले, माती आदी नैसर्गिक वस्तूंच्या साहाय्याने सुशोभित रांगोळी व विविध कलाकृती तयार केल्या. या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेला, कलागुणांना व पर्यावरणपूरक दृष्टिकोनाला चालना मिळाली.
१९ सप्टेंबर रोजी योग व ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थिनी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी योगासने, प्राणायाम व ध्यानाचा सराव केला. शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता व एकाग्रतेचे महत्त्व यावेळी समजावून सांगण्यात आले.
या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये देशप्रेम, स्वच्छतेची सवय, सामाजिक बांधिलकी, श्रमप्रतिष्ठा, पर्यावरण संवर्धन व सर्जनशीलता विकसित होण्यास मदत झाली. ग्रामस्थांनीही उपक्रमांचे कौतुक केले.
या उपक्रमासाठी प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती मालती सोनवणे, श्रीमती सोनाली महाजन, श्री. दिनेश दराडे, श्री. मनोज देवरे, श्री. अनंत दाणी, श्री महेंद्र भदाणे,श्रीमती दिपाली देसले तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग व सहकार्य केले.



