नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

इचलकरंजीत गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक उघड

५.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी — नारायण कांबळे

कोल्हापूर:- इचलकरंजी (ता.हातकणंगले) गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले विविध ब्रँडचे मद्य बेकायदा वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने विक्रमनगर परिसरात कारवाई केली. या कारवाईत फोर्ड फियस्टा कारसह एकूण ५ लाख ३९ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मल्लिकार्जुन शंकर पनोरी (वय ४६, रा. वेताळपेठ, गल्ली क्रमांक ३, इचलकरंजी) याला अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार २६ ऑक्टोबरपासून राज्यभर विशेष संयुक्त मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत २७ ऑक्टोबर रोजी गोपनीय माहितीच्या आधारे इचलकरंजी विभागाने विक्रमनगर येथे ही कारवाई केली.

यावेळी करड्या रंगाची फोर्ड फियस्टा कार (एमएच ०९ एक्यू ३२४२) जप्त करण्यात आली. या वाहनातून गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या दोन लिटरच्या १३ बाटल्या, रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या दोन लिटरच्या सात बाटल्या, रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या १२ बाटल्या, ओल्ड मंक रमच्या ७५० मिलीच्या चार बाटल्या आणि रिझर्व्ह ७ व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या ९३ बाटल्या जप्त करण्यात आल्या. या सर्व मद्याच्या बाटल्यांवर ‘सेल फॉर गोवा’ असा उल्लेख होता.

या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. एस. कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस. एस. हिंगे, एस. वाय. इनामदार, एम. पी. खेत्री, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अजित बोंगाळे तसेच जवान मुकेश माळगे, आदित्य कोळी आणि सिद्धांत शेटे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. एस. हिंगे करीत आहेत.

दरम्यान, इचलकरंजी कार्यक्षेत्रात अवैध मद्यनिर्मिती, साठवणूक, विक्री किंवा वाहतूक आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निरीक्षक ए. एस. कोळी यांनी दिला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
1:00 pm, October 28, 2026
31°C
टूटे हुए बादल
28 %
20 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 58%
Visibility: 10 km
Sunrise: 6:31 am
Sunset: 5:57 pm
Translate »
error: Content is protected !!