नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बँकेची ३ कोटी ३० लाखांच्या कच्च्या मालाची परस्पर विक्री, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी- संदीप सकट चंदगड

कोल्हापूर :- चंदगड येथील विनायक कॅश्यु इंडस्ट्रीजच्या गोदामात बँकेच्या ताब्यात असलेला सुमारे ३ कोटी ३० लाख रुपये किमतीचा कच्चा माल गोदामाच्या मागील बाजूचे पत्रे काढून परस्पर विक्री केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चंदगड पोलिसांनी अजय विनायक कानेकर, अश्विनी विनायक कानेकर आणि विनायक सुधाकर कानेकर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बँकेची फसवणूक आणि मालाची चोरी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३३३, ३१८ आणि ३(५) प्रमाणे २७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ७.५६ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.या प्रकरणातील फिर्यादी सुनील बसवराज पिल्लई (वय ३८, सध्या रा. देसाईवाडी, ता. चंदगड, मूळ रा. गदग, कर्नाटक) हे बँक ऑफ इंडिया, चंदगड शाखेचे खातेदार आहेत. चंदगड येथे विनायक कॅश्यु इंडस्ट्रीज सुरू करण्यासाठी त्यांनी औद्योगिक जमीन, गोदाम तसेच अन्य तारण व औद्योगिक सुविधांसाठी बँकेकडून एकूण ५ कोटी ८१ लाख ६३ हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.त्यापैकी ५६ लाख १७ हजार १८३ रुपयांची परतफेड करण्यात आली असून, उर्वरित ५ कोटी २५ लाख ४५ हजार ८१७ रुपये बँकेकडे देणे बाकी असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
बँकेने दिलेल्या कर्जातून खरेदी केलेला ३ कोटी ३० लाख रुपये किमतीचा कच्चा माल विनायक कॅश्यु इंडस्ट्रीजच्या गोदामात ठेवण्यात आला होता. सदर माल बँकेच्या ताब्यात असून गोदामाच्या चाव्याही बँकेकडे असल्याची माहिती आरोपींना होती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.असे असतानाही, १७ डिसेंबर २०१९ ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आरोपींनी गोदामाच्या मागील बाजूचे पत्रे काढून बँकेला कोणतीही पूर्वकल्पना न देता कच्च्या मालाची परस्पर विक्री केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या व्यवहारामुळे बँकेची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून आणि वरिष्ठांची मंजुरी घेऊन चंदगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:17 pm, October 31, 2026
32°C
साफ आकाश
37 %
11 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 7%
Visibility: 10 km
Sunrise: 6:32 am
Sunset: 5:56 pm
Translate »
error: Content is protected !!