नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अहिल्यानगरमधील खळबजनक खुनी हल्ल्यातील दोन रेकॉर्डवरील आरोपींना कोल्हापुरात बेड्या; कोल्हापूर LCB शाखेची धडक कारवाई! 

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – नारायण कांबळे

कोल्हापूर :- अहिल्यानगर जिल्ह्यात बंदुकीने फायरिंग करून खुनी हल्ला करणाऱ्या दोन सराईत व रेकॉर्डवरील आरोपींना कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने एका धडक कारवाईत कोल्हापूर जिल्ह्यातून जेरबंद केले आहे. ‘तू पोलिसांचा खबऱ्या आहेस का?’ असा जाब विचारत हा जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. 
दि. १०/१०/2026 रोजी पहाटेच्या सुमारास नागफनी, साईनाथनगर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे ही थरारक घटना घडली. आरोपी कल्याण भानुदास चव्हाण व इतर १० जणांनी (सर्व रा. देवगड फाटा, ता. नेवासा) फिर्यादी रमेश छगन भोसले यांना गाठले. “तू पोलिसांचा खबऱ्या होतो का?” अशी विचारणा करत आरोपींनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर आरोपी अभिषेक उर्फ अभि कल्याण चव्हाण याने त्याच्या हातातील बंदुकीने रमेश भोसले यांच्या पाठीत गोळी मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व “तुम्हाला एकाएकाला यासारखीच गोळी मारून संपवून टाकू” अशी धमकी दिली. तसेच कुणाल चव्हाण याने हातातील तलवार व लाकडी दांडक्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 844/2026 नुसार भा.न्या.सं. कलम १०९(१), ११८(१), ११५(२), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ३५१(२), ३५२ सह आर्म्स अॅक्ट कलम ३, ४, २५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. 
कोल्हापुरात लपल्याची मिळाली होती गुप्त माहिती:
गुन्हा केल्यानंतर हे आरोपी कोल्हापूर जिल्ह्यात आपले अस्तित्व लपवून वावरत असल्याची गोपनीय बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळाली. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नीलोत्पल , अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने कसून शोधमोहीम सुरू केली. 
पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, सत्यजित तनुगडे, विशाल खराडे, शिवानंद मठपती, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, संतोष बरगे, या पथकाने गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे हद्दीतील कन्हेरी माधव नगर, जिल्हा कोल्हापूर येथे सापळा रचला. दिनांक १६/११/2026 रोजी केलेल्या या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले: 
१. अभिषेक उर्फ अभि कल्याण चव्हाण (वय २४)
२. हरन कल्याण चव्हाण (वय २२) (दोघेही रा. देवगड फाटा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) 
सदर दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. कोल्हापूर पोलीस दलाच्या या धडक आणि तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:13 am, November 19, 2026
23°C
साफ आकाश
40 %
7 Km/h
Wind Gust: 8 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:43 am
Sunset: 5:49 pm
Translate »
error: Content is protected !!