🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी दौलतराव पाटील
सांगली(बागणी):- सांगली पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टा पोलीस स्टेशन हद्दीतील बागणी गावामध्ये नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी, यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने डायल 112 ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेअंतर्गत पोलीस मदत, वैद्यकीय आपत्कालीन मदत ,अग्निशामक सेवा, महिला सुरक्षा तसेच रस्ता अपघात यासारख्या विविध अपत्कालीन प्रसंगी नागरिकांना केवळ 112 हा क्रमांक डायल करून मदत मिळू शकते. ही ऑनलाईन सेवा 24 तास चालू आहे. आपत्कालीन परिस्थिती घाबरून न जाता तत्काळ 112 वर संपर्क साधल्यास आवश्यक मदत मिळू शकते असे बागणी बीट चे हवलदार अमोल शिंदे व प्रवीण ठेवणे यांनी माहिती दिली.
यावेळी उपस्थित
ग्रामपंचायत बागणीचे माजी सदस्य मारुती बामणे बागणी गावचे पोलीस पाटील हरी ठाकूर, काकाचीवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप कोळी व नागरिक उपस्थित होते.



