नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वाढदिवसानिमित्त मोफत मोबाईलची मागणी; दुकानदाराला शिवीगाळ व धमकी, मिरजेत गुन्हा दाखल

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी – राजेंद्र पवार 

 

मिरज :- “आज माझा वाढदिवस आहे, मला गिफ्ट म्हणून मोफत मोबाईल द्या,” अशी मागणी करत मोबाईल दुकानात गोंधळ घालणे, कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे तसेच दुकान मालकाला फोनवरून शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिक मुस्ताक बेपारी (रा. शनिवार पेठ, मिरज) याच्याविरुद्ध हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी नितेश सुंदरदास वाधवा यांच्या एस.के. मोबाईल शॉपीमध्ये संबंधित आरोपीने कर्मचाऱ्यांशी वाद घालत दुकान मालकाचा मोबाईल क्रमांक मागितला.

त्यानंतर आरोपीने दुकान मालकाला फोन करून, “आज माझा वाढदिवस आहे, मला मोफत मोबाईल गिफ्ट द्या,” अशी मागणी केली. मागणी नाकारल्यानंतर शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:01 pm, September 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
54 %
10 Km/h
Wind Gust: 16 Km/h
Clouds: 64%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!