🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर :- ता. हातकणंगले इचलकरंजी येथील
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बेकायदेशीर दारू वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून १५ बॉक्स देशी दारू आणि चारचाकी वाहनासह एका आरोपीला रंगेहाथ पकडले. या कारवाईत एकूण ४,६०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०८:४५ वाजताच्या सुमारास, वैरण बाजार (इचलकरंजी) ते जुना चंदूर रोडवरील दुर्गामाता मंदिराच्या जवळ गुन्हे शोध पथकाला बेकायदेशीर दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. बातमीदाराच्या पक्क्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित टाटा इंट्रा चारचाकी गाडी (क्र. MH 51 C 0806) रोखली. गाडीची पाहणी केली असता, त्यात दारू विक्रीची कोणतीही पावती किंवा परवाना (टीपी) नसताना बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.
जप्त केलेला मुद्देमाल:
टाटा इंट्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी (MH 51 C 0806): किंमत रु. ४,००,०००/-
जी.एम.डॉक्टर देशी दारू (१२ कागदी बॉक्स): किंमत रु. ४८,०००/-
टँगो पंच देशी दारू (३ कागदी बॉक्स): किंमत रु. १२,०००/-
एकूण जप्त मुद्देमाल: रु. ४,६०,०००/-
आरोपीचे नाव:
हुसेन गणी शेख (वय ३० वर्ष, रा. दत्तमंदिर शेजारी, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)
पोलीस पथकाची कामगिरी:
ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत शिवाजीनगर पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपनिरीक्षक माने, सहा. फौजदार अनिल चव्हाण, पो.हे.कॉ. ५९१ सूर्यवंशी, पो.अ. गणेश सनदी, सद्दाम सनदी, शिरीष कांबळे, विकास चौगुले, राहुल कामते, तुषार सूर्यवंशी आणि प्रमोद चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या प्रकरणाचा पुढील अधिक तपास अंमलदार विकास चौगुले करत आहेत.



