नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

उंभर्टीचा तरुण रोहित भदाणे यांची इंडियन आर्मी टेक्निकल शाखेत निवड; नातेवाईक व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव.

DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी अकिल शहा 

साक्री : साक्री तालुक्यातील उंभर्टी येथील श्रीमती मनीषा व सुपडू पुंडलिक भदाणे यांचा चिरंजीव रोहित भदाणे यांना त्यांच्या आई-वडिलांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मोल मजुरी करून रोहित भदाणे चे शालेय शिक्षण पूर्ण केले. रोहित ने पण आई-वडिलांचा कष्टाचा व परिस्थितीचा विचार करून आपलं ध्येय सिद्ध केलं आज एक छोट्याशा गावांमधून इंडियन आर्मी टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये सिलेक्शन होणं खूपच मोठी गोष्ट आहे देश सेवेचा निर्धार त्यांने लहानपणापासूनच आपल्या मनात एक ध्येय केला होता आणि तो ध्येय आज पूर्णत्वास आला आहे. इंडियन आर्मीच्या भरतीसाठी रोहित ने खूपच दिवसापासून सराव सुरु ठेवला होता. आज त्याच्या मेहनतीला देश सेवा करण्याचं फळ मिळालं आहे.

रोहितला संपूर्ण उंभर्टी गावातील ग्रामस्थांचा, मित्रमंडळीचा तसेच नातेवाईकांचा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा यांचा वर्षाव केला जात आहे. रोहितला इंडियन आर्मी टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये सिलेक्शनचं झाल्याचे कळताच त्याच्या आई-वडिलांचे व स्वतः रोहितचे आनंद अश्रू अनावर झाले

देश सेवा करायची रोहित ने मनात ठाम गाठच बांधली होती. आज उंभर्टी गावासाठी तसेच साक्री तालुक्यासाठी धुळे जिल्ह्यासाठी व आपल्या महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की सर्वसाधारण प्रतिकूल परिस्थितीमधून जीवन जगण्याची व्यथा काय असते ते आज या कुटुंबाकडून आपल्या अनुभवास मिळत आहे. गावातील व परिसरातील तरुणाईला एक आदर्श निर्माण व्हावा असा हा संघर्ष आज पूर्ण होताना दिसत आहे. उंभर्टी गावाच्या वतीने परिसराच्यावतीने मित्रमंडळीच्या वतीने नातेवाईकांच्या वतीने रोहितला व त्याच्या आई वडिलांना व त्यांच्या संपूर्ण परिवाराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

देशी सेवा हीच खरी ईश्वर सेवा.

जय जवान जय किसान भारत माता की जय….

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:07 am, July 19, 2026
29°C
घनघोर बादल
59 %
13 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!