विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध करा व होणारी गैरसोय तत्काळ टाळा अन्यथा बस आगारात ठिय्या आंदोलन छेडणार :-प्रा. प्रकाश सोनवणे.
DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी अकिल शहा
साक्री : तामसवाडी ता.साक्री येथील खान्देश एज्युकेशन सोसायटी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या निषेधार्थ आज दि.२४ जून बुधवारी रोजी साक्री बस आगारावर मोर्चा काढला. हा मोर्चा शाळेचे चेअरमन श्री.प्रा.प्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.मोर्चा बस आगार परीसरात पोहचल्यावर आगार व्यवस्थापक सुनिल महाले यांना विद्यार्थ्यांनी घेराव घातला असता आगार प्रमुख महाले यांनी त्वरित वाहक नियंत्रक व संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले व विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी त्यांनी आपल्या केबिनमध्ये बोलून घेतले. यावेळी शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनीनी वेळेवर बस उपलब्ध होत आहे. आम्हाला शाळेची प्रार्थना व पहिला तास वेळेवर सापडत नाही अशा संतप्त भावना त्यांनी व्यक्त केल्या. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण नांद्रे यांनीही यापूर्वीही अनेकवेळा समस्या आपल्याकडे मांडल्या होत्या परंतु या मागण्यांकडे काही वेळेस दुर्लक्ष केले गेल्याचा आरोप त्यांनी केला.
शाळेचे चेअरमन प्रकाश सोनवणे म्हटलें की, पालक वारंवार याविषयी माझ्याकडे तक्रार करीत होते शेवटी विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मी तात्काळ मुंबई येथून वेळ वाया न घालविता खानदेशी एज्युकेशन सोसायटी तामसवाडी संचलित विद्यालय गाठले आणि विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन मी आपल्याकडे समस्या घेऊन आलोय त्या आपण तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी केली. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रा. प्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आगार व्यवस्थापक सुनील महाले यांना देण्यात आले आगार व्यवस्थापक सुनिल महाले यांनी विद्यार्थ्यांच्या भावना, पालकांच्या तक्रारी, चेअरमन सोनवणे यांच्या सूचना लक्षात घेऊन विभाग नियंत्रक वसीम पठाण यांना वेळेवर बस उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले व येत्या दि.२९ जून सोमवार रोजी पासुन बस वेळेवर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या वेळी शाळेचे चेअरमन चेअरमन प्रा.प्रकाश सोनवणे, संस्था सदस्या डॉ. प्रा.रत्नमाला सोनवणे,मुख्याध्यापक प्रवीण आर.नांद्रे, शिक्षक नंदलाल बी. खैरनार, शिक्षीका श्रीमती. वंदना.ए.सोनवणे, जिभाऊ बी. मासुळे, संतोष.के वाघमोडे शिक्षकेतर कर्मचारी नागू बी. सोनवणे, दंगल वाय. अहिरराव, कैलास डी. अहिरे, सुभाष एस. सोनवणे, सय्यद नगर गावातील पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



