नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कदमवाडी येथे पूर्ववैमनस्यातून रिक्षाचालक आणि त्यांच्या मुलावर घातक शस्त्रांनी हल्ला; शाहूपुरी पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – संजय दिंडे

कोल्हापुर :- गांधीनगर येथील बारमध्ये मोफत रिक्षा सोडण्यास नकार दिल्याच्या रागातून चार जणांनी मिळून एका रिक्षाचालकावर आणि त्यांच्या मुलावर गुप्ती, कुऱ्हाड व बांबूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना कदमवाडी येथे घडली आहे. या हल्ल्यात पिता-पुत्र दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल:
स्वप्नील आबाजी आडुळकर (रा. माळ गल्ली, सुवर्णदीप अपार्टमेंट, कदमवाडी, कोल्हापूर)
विजय उर्फ बंडू बयाजी गावडे (रा. विठ्ठल मंदिर चौक, कदमवाडी, कोल्हापूर)
अजय राजु येडगे (रा. अयोध्या गल्ली, कदमवाडी, कोल्हापूर)
लक्ष्मण रामचंद्र बाऊदणे (रा. साळुंखे कॉलनी, कदमवाडी, कोल्हापूर)
नेमका प्रकार काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र सखाराम बावणे (वय ५७, रा. साळुंखे कॉलनी, कदमवाडी, व्यवसाय- रिक्षा) हे २३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या दारात असताना संशयित आरोपी तेथे आले. गांधीनगर येथील ओंकार बारमध्ये दारू पिण्यासाठी रिक्षाने मोफत सोडले नाही, याचा राग मनात धरून आरोपींनी “तुला आता जिवंत सोडत नाही” असे म्हणत रवींद्र बावणे यांच्यावर गुप्तीने पोटावर आणि उजव्या हातावर वार केले.
वडिलांना वाचवण्यासाठी आलेला मुलगा तेजस रवींद्र बावणे याच्यावर कुऱ्हाडीने पाठीवर वार करून बांबूने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णालयात उपचार व शस्त्रक्रिया सुरू असल्याने फिर्याद देण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात आले.
शाहूपुरी पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम १०९(१), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक डोईजड हे पुढील तपास करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:55 am, July 30, 2026
26°C
घनघोर बादल
82 %
22 Km/h
Wind Gust: 39 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:03 am
Sunset: 7:10 pm
Translate »
error: Content is protected !!