नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापूर: ज्वेलरी दुकानातील १७.८६ लाखांच्या सोनेचोरीचा उलगडा; महिला कामगार अटक

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी संजय दिंडे 

कोल्हापूर :- दुकानामध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यानेच तब्बल १७ लाख ८६ हजार रुपये किमतीचे १०५.०४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लांबवल्याचा प्रकार जुना राजवाडा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी विद्या राजेंद्र जाधव (वय ३१, रा. चांदेकऱ्पाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) हिला अटक करून तिच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

संभाजीनगर ते तलवार चौक रस्त्यावरील दत्तात्रय तुकाराम कारेकर यांच्या ज्वेलर्स दुकानात २७ जुलै ते ३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ही चोरी झाली होती. दुकानाचे मालक रोहित मोहन कारेकर (वय ३७, रा. आर. के. नगर, करवीर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या फिर्यादीवरून बी.एन.एस. कलम ३१६(४) व ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास आणि जप्ती:

तपासादरम्यान पोलीस पथकाने संशयित विद्या जाधव हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, महिला अधिकारी व अंमलदारांनी कसून चौकशी केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून १७.८६ लाखांच्या सोन्याच्या साखळ्या, अंगठ्या, वळे, लॉकेट आणि कॉईन असा एकूण १०५.०४ ग्रॅम मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाई करणारे पथक:

पोलीस निरीक्षक किरण लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सायली पडवळ, तसेच पोलीस अंमलदार प्रशांत घोलप, अमर पाटील, मोहन लगारे, प्रतिक शिंदे, योगेश राक्षे, सत्यजित ढाले आणि बनुताई धनगर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:33 am, August 23, 2026
27°C
घनघोर बादल
72 %
13 Km/h
Wind Gust: 22 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:12 am
Sunset: 6:55 pm
Translate »
error: Content is protected !!