नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

न्यू गणेश तरुण मंडळाच्या तीन लाखांच्या बक्षिसातून हाऊसिंग सोसायटीत विकासकामांची मागणी

महापौर उदय धातुंडे यांच्याकडे नगरसेवक रवी रजपुते यांचे निवेदन; सीसीटीव्ही कॅमेरे व संरक्षक भिंतीसाठी निधी देण्याची मागणी

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी : निवास गागडे

इचलकरंजी : महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीतील तब्बल ४३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या न्यू गणेश तरुण मंडळाने पर्यावरणपूरक गणपती व समाजप्रबोधनपर देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. सन २०२४ मध्ये इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणपती व समाजप्रबोधनपर देखावा स्पर्धेत प्रभाग क्रमांक १० मधील न्यू गणेश तरुण मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला होता. मंडळाला शिल्ड व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले होते, तसेच तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
मात्र, बक्षिसाची रक्कम अथवा त्याअनुषंगाने परिसरातील विकासकामांचा निधी अद्याप मिळालेला नसल्याने मंडळ व परिसरातील नागरिकांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक रवी साहेब रजपुते यांनी इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर उदय धातुंडे यांची भेट घेऊन चर्चा केली. न्यू गणेश तरुण मंडळाला मिळालेल्या तीन लाख रुपयांच्या बक्षिसाच्या रकमेतून महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, संरक्षक भिंत बांधणे तसेच आवश्यक विकासकामे करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी महापौर उदय धातुंडे यांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर पाठपुरावा करून बक्षिसाची रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी तसेच परिसरातील आवश्यक विकासकामे मार्गी लावण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
यावेळी महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन धनाजी डोईफोडे, व्हाईस चेअरमन गणेश जाधव, सुकाणू समिती प्रमुख संतोष मांगले, न्यू गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष अमित ठाणेकर, उपाध्यक्ष सागर कोष्टी, खजिनदार अनुप ढोकळे, निवास गागडे व अमित पाडळे उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते महापौर उदय धातुंडे यांना विकासकामांसंदर्भातील निवेदन देण्यात आले.
न्यू गणेश तरुण मंडळाने मिळविलेल्या पुरस्काराचा निधी केवळ बक्षीस म्हणून न पाहता तो परिसराच्या सुरक्षितता व विकासासाठी वापरला जावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:33 am, August 23, 2026
27°C
घनघोर बादल
72 %
13 Km/h
Wind Gust: 22 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:12 am
Sunset: 6:55 pm
Translate »
error: Content is protected !!