🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी : संदीप सकट
चंदगड :- चंदगड तालुक्यातील सातवणे येथे दारूच्या नशेत असलेल्या मुलाने स्वतःच्या आई-
वडिलांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना 29 जुलै रोजी सायंकाळी घडली. या घटनेत वडील आणि आई गंभीर जखमी झाले असून चंदगड पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेश शंकर पारसे (वय 61, रा. सातवणे, ता. चंदगड) यांनी चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी दशरथ सुरेश पारसे (वय 32) हा फिर्यादीचा मुलगा असून त्याला दारूचे व्यसन असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेच्या दिवशी आरोपी दारूच्या नशेत देवघरात झोपला होता. घरात दारूचा तीव्र वास येत असल्याबाबत आई-वडिलांनी बोलल्याचा राग आल्याने आरोपीने देवघरातील कोयता उचलून वडील सुरेश पारसे यांच्या डोक्यावर वार केला. त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या आई नंदा सुरेश पारसे यांच्या उजव्या हाताच्या पंजावरही कोयत्याने वार करून जखमी केले. तसेच फिर्यादीस शिवीगाळ करत पुन्हा कोयत्याच्या मागील बाजूने पाठीवर मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.जखमींवर गडहिंग्लज येथील एपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.उपचारा
दरम्यान फिर्यादी यांनी दिलेल्या जबाबावरून चंदगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 251/2026 अन्वये बीएनएस 2023 च्या कलम 118(1) व 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राजीगरे करत आहेत.



