इचलकरंजी महापालिकेला १५ दिवसांचा अंतिम अल्टिमेटम; अन्यथा तीव्र लोकशाही आंदोलनाचा इशारा.
🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर:- इचलकरंजी महानगरपालिकेतील दिव्यांग बांधवांच्या हक्काचा ५% निधी आता बैठका, चर्चा आणि आश्वासनांमध्ये अडकवून ठेवला जाणार नाही. शासन निर्णयानुसार दिव्यांगांसाठी राखीव निधीची तातडीने निश्चिती करून त्याचे पारदर्शक पद्धतीने वाटप करावे, अशी ठाम मागणी प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
दिव्यांगांच्या प्रश्नावर बैठका घेणे स्वागतार्ह आहे; मात्र “बैठका नकोत, आता निर्णय हवा; आश्वासने नकोत, शासन निर्णयाची अंमलबजावणी हवी!” अशी स्पष्ट भूमिका संघटनेने घेतली आहे.
सन २०१८ व २०२२ मधील शासन निर्णयांचा आधार घेऊन महानगरपालिकेच्या स्वउत्पन्नातून दिव्यांगांसाठी राखीव ५% निधीची योग्य गणना व तरतूद करावी. तसेच बांधील खर्च वजा करून निधीची गणना करण्याची पद्धत शासन निर्णयाशी सुसंगत आहे की नाही, याची स्पष्ट लेखी माहिती द्यावी.
मागील चार वर्षांतील ५% निधीची वर्षनिहाय जमा, तरतूद, खर्च आणि शिल्लक रक्कम, तसेच हा निधी कोणत्या योजनांवर खर्च करण्यात आला, याचा संपूर्ण तपशील दिव्यांग संघटनांना लेखी स्वरूपात उपलब्ध करून द्यावा.
याशिवाय कोल्हापूर येथे संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कोणते निर्णय झाले आणि पुढील कार्यवाही काय आहे, याची अधिकृत माहितीही द्यावी.
या सर्व मागण्यांवर निवेदन प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत स्पष्ट, लेखी आणि ठोस निर्णय घ्यावा, असा अंतिम अल्टिमेटम महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.
१५ दिवसांत समाधानकारक निर्णय न झाल्यास अर्धनग्न बेमुदत उपोषण, रास्ता रोको, इचलकरंजी बंद यांसह विविध लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार सामाजिक संघटनेने दिला आहे.
दिव्यांगांचा ५% निधी ही कोणाचीही मेहरबानी नाही; शासनाच्या तरतुदीनुसार दिव्यांगांच्या कल्याणासाठी असलेला हा हक्काचा निधी आहे. त्यामुळे आता वेळकाढूपणा थांबवा, शासन निर्णयाची अंमलबजावणी करा आणि दिव्यांगांचा हक्काचा निधी तातडीने उपलब्ध करून द्या!
बैठका नकोत — निर्णय हवा!
आश्वासने नकोत — शासन निर्णयाची अंमलबजावणी हवी!
दिव्यांगांचा हक्काचा ५% निधी — तातडीने द्या!
प्रमुख पदाधिकारी व उपस्थित :
कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष मा. विकास गायकवाड’
सुनील पाटील — उपजिल्हाध्यक्ष, उत्तर विभाग,
अनिल विजयनगरे — शहराध्यक्ष,
इरफान बागवान — उपाध्यक्ष,
दादासो सुतार — जिल्हा संपर्कप्रमुख,
सुनील शिंदे तालुकाध्यक्ष
दत्ता मांजरे मानवाधिकार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
मनीषा घोटणे — महिला तालुकाअध्यक्ष
विजय घोटणे
संभाजी सूर्यवंशी
शितल सुतार
अनिल डांगे
अमर पवार
शब्बीर जमादार
रावसो लोखंडे
महानंदा पाटील
निता अतिग्रे
गीता बडिगेर
राणी रॉय
तसेच दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



