नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धाडणेत गुरूपौर्णिमा निमित्त श्री.स्वामी समर्थ महाराज प्रतिमा पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात संपन्न.

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी अकिल शहा 

 

साक्री : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूकुल पीठाच्या वतीने श्री स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने धाडणे ता.साक्री येथे दि.२९ जुलै बुधवारी रोजी गुरु पौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेची पालखी सोहळा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ केंद्र(साक्री) व धाडणे गावातील नागरिकांच्या वतीने करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ प्रतिमेची पालखी सोहळा मिरवणुकीची सुरूवात टाळ मृदंगाच्या गजरात ग्राम दैवत आशापुरी माता मंदिरापासून स्वामींच्या जयघोषात करण्यात आली. फुलांनी सजवलेल्या पालखीवर प्रचंड पुष्पवृष्टी करण्यात आली, मिरवणूकीच्या स्वागतासाठी ठीक ठिकाणीं रांगोळ्याच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. प्रतिमा पालखी सोहळा मिरवणूक जि.प.केंद्र शाळे मार्गे मार्गक्रमित करीत संपूर्ण गावात महिलांच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेच्या पालखीचे पुजन व आरती करुन स्वागत करण्यात आले,चिमुकल्या विद्यार्थिनी यांनी ही उत्साहात सहभाग घेवून दिंडी नृत्य,फुगडी नृत्य सादर केले शेवटी प्रतिमा पालखी सोहळा मिरवणूकीची सांगता ग्राम दैवत आशापूरी देवी मंदिराजवळ कऱण्यात आली.या वेळी धाडणे गावासह,पेरेजपुर शेवाळी(दा),छ.पखरून, अष्टाने,प्रतापपुर,कासारे साक्री,नवडणे अशा विविध गावातील सेवेकरी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:54 am, July 30, 2026
26°C
घनघोर बादल
82 %
22 Km/h
Wind Gust: 39 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:03 am
Sunset: 7:10 pm
Translate »
error: Content is protected !!