नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बाहिरेश्वरमध्ये डॉल्बीवर पोलिसांचा दणका! नियमभंग करणाऱ्या मंडळांवर कारवाई; ८ डॉल्बी सिस्टिम जप्त.

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – आनंद कांबळे

कोल्हापूर :-  ता. करवीर आगामी गणेशोत्सव शांततामय, उत्साहपूर्ण आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने आतापासूनच कडक भूमिका घेतली आहे. बाहिरेश्वर (ता. करवीर) येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी यात्रेदरम्यान डॉल्बीचा वापर करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर करवीर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली असून तब्बल ८ डॉल्बी सिस्टिम जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे नियम मोडणाऱ्या मंडळांचे धाबे दणाणले आहेत.

करवीर पोलिस ठाणे हद्दीतील बाहिरेश्वर येथे प्राचीन श्रीकृष्ण मंदिर असून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी येथे मोठ्या उत्साहात यात्रा साजरी केली जाते. यात्रेदरम्यान विविध मंडळांकडून डीजे व डॉल्बी लावण्यात येतात. जन्माष्टमीची यात्रा पार पडल्यानंतर गणेशोत्सव जवळ आल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशोत्सवामध्ये डॉल्बी वाजवायची की नाही, याबाबतची चर्चा सुरू होती.

दरम्यान, यावर्षी बाहिरेश्वर येथील विविध मंडळांनी यात्रेसाठी डॉल्बी लावण्याची परवानगी मागितली होती. मंडळांना स्पीकर परवानगी देताना ध्वनिप्रदूषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० मधील तरतुदींचे उल्लंघन होणार नाही, याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.

डॉल्बी लावताना डॉल्बीसमोर समोरासमोर घेऊन आवाजाची चुरस अथवा हुल्लडबाजी करू नये, ट्रॅक्टरच्या बोनेटवर फळी टाकून त्यावर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नृत्य करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच संबंधित मंडळांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ प्रमाणे नोटिसाही देण्यात आल्या होत्या.

मात्र, पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून क्रॅक मेंबर्स, एस.पी. बॉईज, फेमस ग्रुप, रॉयल क्लब, फार्म हाऊस ग्रुप, एम.पी. बॉईज, युवा सर्कल ग्रुप आणि पठार किंग ग्रुप या मंडळांकडून श्रीकृष्ण जन्माष्टमी यात्रेवेळी डॉल्बी लावून नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.

ट्रॅक्टरच्या बोनेटवर नाच; डॉल्बी सिस्टिमसह वाहने ताब्यात

पोलिसांच्या निदर्शनास आलेल्या प्रकारात मंडळाचे कार्यकर्ते ट्रॅक्टरच्या बोनेटवर फळी टाकून त्यावर नृत्य करत असल्याचे आढळून आले. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत ८ डॉल्बी सिस्टिम जप्त केल्या असून ८ डॉल्बी सिस्टिमचे ६ टेंपो/वाहनेही पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत.

या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात संबंधित मंडळांचे अध्यक्ष, डॉल्बी मालक तसेच ट्रॅक्टर मालकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गणेशोत्सवापूर्वी पोलिसांचा स्पष्ट इशारा

आगामी गणेशोत्सव शांततेत आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने या कारवाईतून स्पष्ट संदेश दिला आहे. डॉल्बीचा फाटा देऊन पारंपरिक वाद्यांचा वापर करून गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉल्बीचा दणदणाट करणाऱ्या मंडळांना पोलिसांच्या या कारवाईने चांगलाच दणका बसला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलेात्पल यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी करे, पोलीस उपनिरीक्षक शंकर कळकुटे तसेच पोलिस अंमलदार सुहास पोवार, अविनाश पोवार, विजय तळसकर, रणजित पाटील, महेश घाडगे, सुनील देसाई, सुशांत धनवडे, संजय काशीद, योगेश कांबळे, सुदर्शन वर्धन, प्रकाश कांबळे, महेश बांबळे, अमोल चव्हाण, प्रवीण बोरचाटे, आशीष शेलार, अमित जाधव, सुमित्र पोवार आणि गणपत पवार यांनी सहभाग घेतला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:21 pm, September 20, 2026
34°C
छितरे हुए बादल
39 %
12 Km/h
Wind Gust: 11 Km/h
Clouds: 39%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!