नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ उपक्रमांतर्गत उंबरखेड येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

१२७ नागरिकांनी घेतला लाभ; ८ बीपी तर ६ मधुमेहाचे रुग्ण आढळले

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी अजगरभाई मुल्ला 

चाळीसगाव : “आरोग्य हीच खरी संपत्ती” हा मोलाचा संदेश घराघरांत पोहोचवण्यासाठी आणि गावातील प्रत्येक नागरिकाला सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरखेड (ता. चाळीसगाव) अंतर्गत उपकेंद्र उंबरखेड येथे ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हे शिबीर जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, डॉ. अशहर अंजुम व डॉ. प्रियंका शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

शिबिरातील प्रमुख उपक्रम व तपासणी:

एनसीडी (NCD) स्क्रिनिंग: बिगर संसर्गजन्य रोगांची (Non-Communicable Diseases) सखोल तपासणी करण्यात आली.

स्त्री-आरोग्य तपासणी: शिबिरात महिलांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली.

समुपदेशन व आरोग्य शिक्षण: शिबिरात आलेल्या प्रत्येक लाभार्थी रुग्णाला योग्य ते समुपदेशन देऊन आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

१२७ रुग्णांची तपासणी:

या आरोग्य शिबिराचा एकूण १२७ रुग्णांनी लाभ घेतला. तपासणीदरम्यान ८ रुग्ण उच्च रक्तदाबाचे (बीपी) तर ६ रुग्ण मधुमेहाचे (शुगर) आढळून आले. या सर्व रुग्णांवर तसेच इतर उपचारित रुग्णांवर मोफत औषधोपचार करून त्यांना आवश्यक ते आरोग्य शिक्षण देण्यात आले.

कर्मचाऱ्यांचे योगदान:

शिबीर यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी आरोग्य सहाय्यक श्री. एस. नागरे, श्री. आर. कोल्हे, आरोग्य सेवक  एन. एन. विसपुते, आरोग्य सेविका श्रीमती एस. साळवे, श्रीमती एस. बाविस्कर, श्रीमती एस. डी. घरटे (BF), श्रीमती एस. सावळे (GNM), प्रयो. शाळा तंत्रज्ञ श्री. एस. नाईक, परिचर रोशनी ठाकरे, नीरज वाघ तसेच सर्व आशा स्वयंसेविका व मदतनीस उपस्थित होते.

गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत आरोग्य विभागाचे आभार मानले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:01 pm, September 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
54 %
10 Km/h
Wind Gust: 16 Km/h
Clouds: 64%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!