नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बोगस डॉक्टरांना अभय देणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी गुलाबराव भदाने 

जळगाव:- पाचोरा शहरात बोगस डॉक्टरांकडून बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय सुरू असून, त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी संबंधित तालुका वैद्यकीय अधिकारी त्यांना अभय देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच बोगस डॉक्टरांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे रिपब्लिकन सेना पाचोरा तालुका अध्यक्ष विशाल बागुल पाचोरा तालुका महासचिव दीपक रजपूत यांनी तक्रारीद्वारे मागणी करण्यात आली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे

पाचोरा शहरात 150 हुन अधिक छोटे मोठे दवाखाने अस्तित्वात असून फक्त 44 डॉक्टरांचे लिस्ट वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे आहे. तर मग बाकी 100 हून अधिक डॉक्टर पाचोरा शहरामध्ये बोगस आहेत का ? बोगस डॉक्टरांची पडताळणी करण्याच्या दृष्टीने विविध स्तरावर गठीत केलेल्या शासन निर्णय वै.शि.व औ.द्र.वि.क्र. (सी .आय.एल ) 1091 सीआर172एम ईडी-8 दिनांक 04/10/1991 अनन्वय प्रत्येक महिन्यास सक्तीने सदर बोगस डॉक्टरांचा शोध घेणे आवश्यक असताना आणि नॅचरोपॅथी वैद्यकीय व्यवसाय बाबत आपणाकडे पुराव्यानिशी बोगस डॉक्टर संदर्भात तक्रारी प्राप्त असताना देखील महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 मधील कलमा अनन्वय तरतुदीनुसार आवश्यक ती कारवाई करताना प्रथम दर्शनी दिसून येत नाही. तसेच शासन निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग क्रमांक सी आय एम 1099/प्र.क्र.355/99 दिनांक 07/02/2000 अनन्वय बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी समित्या गठीत करण्यात आल्या असून सदर समिती यांनी बोगस वैद्यकीय व्यवसायिकां बाबतची माहिती पोलिसांना उपलब्ध करून दिल्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 च्या कलमान्वये संबंधिताविरुद्ध न्यायालयात सन 2023 पासून ते आज रोजी पर्यंत सदर विषयावर किती बोगस डॉक्टरांवर कारवाई केली याचा 1 एप्रिल 2023 सुमारे तीन वर्षांपासून तालुक्यातील बोगस डॉक्टरांविषयी चौकशी अहवाल मिळण्यासाठी निवेदन दिले परंतु तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कोणतीही प्रभावी कारवाई अथवा चौकशी केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण झाला असून संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या वैधानिक कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येते.

कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे बोगस डॉक्टरांचे मनोबल वाढत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी व संबंधित बोगस डॉक्टरांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही रिपब्लिकन सेना पाचोरा तर्फे दिला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:55 am, July 30, 2026
26°C
घनघोर बादल
82 %
22 Km/h
Wind Gust: 39 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:03 am
Sunset: 7:10 pm
Translate »
error: Content is protected !!