नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरजेत इंस्टाग्राम पोस्टवरून खळबळ; छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या सादीक गवंडीविरुद्ध गुन्हा दाखल

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – राजेंद्र पवार

मिरज — समाज माध्यमावर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल प्रक्षोभक व आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मिरजेतील सादीक गवंडी (रा. ईदगाह नगर, मिरज) याच्याविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संबंधित तरुणाने आपल्या इंस्टाग्राम आयडीवरून वादग्रस्त पोस्ट प्रसिद्ध केली होती. या पोस्टमध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी अवमानकारक भाषा वापरून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असा मजकूर टाकण्यात आल्याचा आरोप आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, सांगली पोलिस प्रशासनाने समाज माध्यमांवर द्वेष पसरवणारे, धार्मिक भावना भडकवणारे अथवा महापुरुषांचा अवमान करणारे पोस्ट करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:34 pm, September 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
65 %
12 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Clouds: 73%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!