नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सांगली हादरली! दगडाने ठेचून ५० वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून; वसंतदादा कारखान्यामागील बैल अड्डा परिसरात खळबळ

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी रमजान मुलाणी

सांगली:- शहरातील वसंतदादा साखर कारखान्यामागील बैल अड्डा परिसरात आज सकाळी थरारक घटना उघडकीस आली. ५० वर्षीय राजेंद्र घायतिडक यांचा अज्ञातांनी दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. खुनामागील कारण अद्याप अस्पष्ट असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
या घटनेमुळे सांगली शहरात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:35 pm, September 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
65 %
12 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Clouds: 73%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!