नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरज पंचायत समितीच्या सभेत नामकरणावरून वाद; बिबट्या-मगरींच्या दहशतीवर वन विभागाला इशारा

🚨DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी-राजेंद्र पवार 

मिरज : मिरज पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत नव्याने उभारण्यात आलेल्या सभागृहाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. याचबरोबर परिसरात वाढलेल्या बिबट्या व मगरींच्या दहशतीचा मुद्दाही सभेत गाजला. संबंधित प्रश्नांवर तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सदस्यांनी दिला.

सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या सदस्या संगीता कोळी यांनी नव्या सभागृहाला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव मांडला. या प्रस्तावाला भाजपचे सदस्य विनायक जाधव यांनी अनुमोदन दिल्यानंतर बीडीओ ज्ञानदेव मदके यांनी ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली.

मात्र, उद्घाटनापूर्वी नामकरणाचा निर्णय घेण्यास भाजपच्या राणी मोरे यांनी विरोध दर्शविला. तसेच सदस्य विनोद गायकवाड यांनी सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली. यामुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आणि सदस्यांमध्ये शाब्दिक वाद रंगला.

दरम्यान, डिग्रज, दुधगाव व परिसरात बिबट्या तसेच मगरींच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. वन विभागाने तातडीने कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही सभेत देण्यात आला.

सभेतील नामकरणाचा वाद आणि वन्यप्राण्यांच्या वाढत्या दहशतीबाबतची चिंता हे दोन्ही मुद्दे केंद्रस्थानी राहिल्याने मिरज पंचायत समितीची ही सभा विशेष चर्चेचा विषय ठरली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:22 am, July 19, 2026
30°C
घनघोर बादल
53 %
10 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!