🚨DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – सचिन कोळी उदगाव
कोल्हापूर :- शिरोळ येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार संजय बापू तेली (वय ५२, रा. आळते, ता. हातकणंगले) यांना वारस व फेरफार नोंद करण्याच्या कामासाठी दोन हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांच्या आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या नावावरील मिळकतीवर वारस व फेरफार नोंद करण्यासाठी त्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय शिरोळ येथे अर्ज केला होता. हे काम आरोपी संजय तेली यांच्याकडे प्रलंबित होते.संबंधित काम करून देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपीने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच स्विकारताच संजय तेली यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.ही कारवाई वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप तसेच पोलिस हेडकॉन्स्टेबल सुधीर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील, संदीप पवार आणि रविंद्र पाटील यांच्या पथकाने केली.



