नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शेतकऱ्यांच्या मोटारी चोरणाऱ्या टोळीचा छडा; हुपरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – नारायण कांबळे

कोल्हापूर:- ता. हातकणंगले : हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या पंप चोरीच्या मालिकेचा छडा लावत पोलिसांनी सराईत आरोपीला अटक करून तब्बल ₹४,७८,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील शेतकरी व पंपमालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलै २०२६ रोजी रात्री १० तसेच २७ जुलै सकाळी ८.३० वाजेपर्यंत हुपरी येथील माळी पेट्रोल पंपाजवळील शेत परिसरातून पाण्याच्या पंपाच्या मोटारी चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १७०/२०२६ भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
पोलिसांनी आरोपीकडून खालील साहित्य हस्तगत केले आहे :
₹२८,००० – ५ HP व ३ फेज असलेली पाण्याची मोटार
₹१६,००० – ३ HP व ३ फेज असलेली पाण्याची मोटार
₹१५,००० – २ HP व ३ फेज असलेली पाण्याची मोटार
₹१९,००० – STP पंप सेट
₹४,००,००० त्यात MH-05 AB- 5684 एक मारूती सुझुकी कंपनीची स्वीप्ट अॅरेंज रंगाची जुनी वापरलेली कार असे
एकूण जप्ती : ₹४,७८,०००
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुकेश गणपती जाधव (वय ४१ रा.खोतवाडी ,ता. हातकणंगले ,) संगीता उर्फ माया मुकेश जाधव(वय ४०,रा.खोतवाडी,ता. हातकणंगले) यास ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात आरोपीने विविध सोसायटी व शेत परिसरातून मोटारी आणि वायर चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हुपरी
पोलीस निरीक्षक सत्यवान हाके
पो.हे.कॉ. बांगर, कांबळे,
पो.कॅ. कोरवी, धुळे, सोनवणे, मगदुम, बरगाले,राणगे यांचा समावेश होता.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:26 am, August 4, 2026
25°C
घनघोर बादल
83 %
7 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:05 am
Sunset: 7:08 pm
Translate »
error: Content is protected !!