नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

रेकॉर्डवरील गुन्हेगारावर शहापूर पोलिसांचा धडाकेबाज कारवाई; पिंटू उपेंद्र रॉय याला तब्बल दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – नारायण कांबळे

कोल्हापूर:- ता. हातकणंगले, इचलकरंजी शहापूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहापूर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगाराविरोधात मोठी कारवाई करत त्याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

शहापूर पोलिस ठाण्याच्या अभिलेखावरील आरोपी पिंटू उपेंद्र रॉय (रा. तुळजाभवानी अपार्टमेंट, शाहूपूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध वारंवार गुन्हे दाखल होत असल्याने त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५६(१)(ब) अन्वये हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीविरुद्ध शहापूर पोलिस ठाण्यात एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. त्याच्या सातत्याने सुरू असलेल्या गुन्हेगारी हालचालींमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहापूर पोलिसांनी सविस्तर प्रस्ताव तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला होता.
या प्रस्तावाची छाननी करून उपविभागीय दंडाधिकारी, इचलकरंजी उपविभाग यांनी आरोपीला दोन वर्षांच्या कालावधीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश जारी केला. आदेशानुसार आजपासून पिंटू उपेंद्र रॉय याला कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीबाहेर करण्यात आले आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत. त्यानुसार शहापूर पोलिस ठाण्याने ही कारवाई प्रभावीपणे राबवली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर यापुढेही कठोर पावले उचलली जाणार आहेत.
स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, अशा सराईत गुन्हेगारांवर वेळेवर कारवाई होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
शहापूर पोलिसांचा स्पष्ट इशारा :
रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी गुन्हेगारी कृत्यांना आळा घालावा, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:03 pm, September 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
54 %
10 Km/h
Wind Gust: 16 Km/h
Clouds: 64%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!