नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

इचलकरंजी पुरवठा कार्यालयात खाजगी व्यक्तीला सोबत घेऊन रात्री उशिरापर्यंत कामकाज!तहसीलदारांची परवानगी नसल्याचे स्पष्ट 

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी – नारायण कांबळे

 

कोल्हापूर:-  ,ता. हातकणंगले इचलकरंजी अप्पर तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या पुरवठा कार्यालयात कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे,दि. ७/८/२०२६ रोजी हे कामकाज पुरवठा कार्यालय मधील ( शिपाई) संकेत जाधव हे एका खाजगी व्यक्तीला कार्यालयात घेऊन काम केले जात असल्याचे सांगण्यात येत असून, या प्रकारास अप्पर तहसीलदारांची पूर्वपरवानगी नसल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शासकीय कार्यालयांमध्ये अधिकृत अधिकारी व

कर्मचाऱ्यांमार्फतच कार्यालयीन कामकाज होणे अपेक्षित असताना कार्यालयीन वेळेनंतर खाजगी व्यक्तीच्या उपस्थितीत कामकाज सुरू असल्याने या प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे. संबंधित खाजगी व्यक्तीला कार्यालयात कोणत्या अधिकाराने प्रवेश देण्यात आला? त्याच्याकडून नेमके कोणते काम करून घेतले जात आहे?तसेच या कामाची जबाबदारीकोणाची? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.कार्यालयीन वेळ संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कोणत्या फाईली, अर्ज किंवा प्रकरणांवर काम करण्यात आले, याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे का, याबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच कार्यालयातील उपस्थिती नोंदवही, सीसीटीव्ही फुटेज, कार्यालयीन वेळेबाहेरील कामकाजासंदर्भातील आदेश व परवानगी आणि संबंधित कामाची नोंद तपासण्याची मागणी होत आहे.

विशेष म्हणजे याकामकाजास अप्पर तहसीलदारांची परवानगी नसल्याचे स्पष्ट होत असल्याने संबंधितअधिकारी-कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ प्रशासनाच्या आदेशांना डावलून कामकाज केले आहे का, याची चौकशी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.पुरवठा विभाग हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वाचा विभाग असल्याने येथे पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने कामकाज होणे अपेक्षित आहे. मात्र, कार्यालयीन वेळेबाहेर खाजगी व्यक्तीच्या उपस्थितीत कामकाज सुरू असल्याच्या प्रकारामुळे पुरवठा विभागात मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप होत आहे. यावर अप्पर तहसीलदार काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:09 am, August 17, 2026
29°C
घनघोर बादल
60 %
22 Km/h
Wind Gust: 29 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:10 am
Sunset: 6:59 pm
Translate »
error: Content is protected !!