वैजनाथ विकास सेवा सोसायटी कडून सत्कार.
🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – प्रा. नागेंद्र जाधव
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक (KDCC )चंदगड तालुका विभागीय अधिकारीपदी बाळकृष्ण चौगुले यांची निवड झाली. त्याबद्दल श्री वैजनाथ विकास सेवा सोसायटी देवरवाडी यांच्यावतीने त्यांचा यशवंतनगर कार्यालयात आज शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला तसेच भावी कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सोसायटी
चेअरमन शंकर वैजनाथ भोगण, ज्येष्ठ संचालक, प्रकाश वैजू करडे, प्रा नागेंद्र कृष्णा जाधव, नामदेव पाटील, जे.डी. पाटील, दत्ता देसाई एस आर गावडे इ मंडळी उपस्थित होते. यावेळी प्रा. नागेंद्र जाधव यांनी आपल्या मनोगतात चौगुले यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी कार्यालयातील इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.



