🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी: अजगरभाई मुल्ला
चाळीसगाव :- मेहुणबारे पोलीस स्टेशनचा प्रभारी पदभार स्वीकारताच परीक्षाविधीन पोलीस उपाधीक्षक सह्याद्री बिर्ले यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक विकास शिरोळे, हवालदार मिलींद कुमावत, प्रकाश कोळी, पो.कॉ. पांडूरंग पाटील, दिपक महाजन यांनी १४ सप्टेंबरला रात्री १०.३० वाजता धडक कारवाई करत अवैध गुटखा वाहतुकीचा पर्दाफाश केला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या वेळी मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पथक दुचाकीवरून दहिवद परिसरात गस्त घालत होते. यावेळी दहिवद बस स्टँडजवळ पांढऱ्या रंगाची मारुती ओमनी (क्रमांक MH 18 S 662) संशयितरीत्या उभी असलेली दिसली. वाहनाच्या काचा उघड्या असल्याने पोलिसांनी चालकाकडे विचारपूस केली असता, त्याने आपले नाव हितेश अनिल आहिरराव (रा. मेहुणबारे, ता. चाळीसगाव) असे सांगितले.
पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा साठा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
- अवैध गुटखा: ३,३२,४०० रुपये
- मारुती ओमनी वाहन: १,००,००० रुपये
- वन प्लस अँड्रॉईड मोबाईल: १५,००० रुपये
- एकूण जप्त मुद्देमाल: ४,४७,४०० रुपये
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दीपक महाजन यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी हितेश आहिरराव याच्याविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्याची कलमे:
भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न व सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम २६(२),(४), २७(३)(C), ५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पदभार घेतल्याच्या पहिल्याच दिवशी पोलीस उपाधीक्षक सह्याद्री बिर्ले यांनी ही धडक कारवाई केल्याने अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास परीक्षाविधीन पोलीस उपाधीक्षक सह्याद्री बिर्ले स्वतः करत आहेत.



