नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आर. के. नगर, मोरेवाडीत करवीर पोलिसांची नाकाबंदी ४० जणांवर कारवाई ३० हजारांचा दंड

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी – आनंद कांबळे 

कोल्हापूर:-  आर. के. नगर व मोरेवाडी परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर करवीर पोलिसांनी बुधवारी अचानक नाकाबंदी करून कारवाई केली. बेशिस्त वाहनचालना व तरुणांकडून होणाऱ्या संभाव्य हुल्लडबाजीला आळा घालण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या तपासणीत विनापरवाना वाहन चालविणे, विना नंबर प्लेट तसेच ट्रिपल सीट अशा नियमभंगांची प्रकरणे आढळून आली.

या कारवाईत एकूण ४० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सुमारे ३० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पोलिसांनी दुचाकींची कागदपत्रे, नंबर प्लेट आणि प्रवासी संख्येची तपासणी केली.ही कारवाई पोलीस निरीक्षक कलमकर, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपनिरीक्षक दीपक टिपूगडे यांच्या मार्गदर्शना
खाली करण्यात आली. यामध्ये पोलीस शिपाई मुंडे तसेच होमगार्ड नलवडे, सूर्यवंशी,कोरोसी, बेरकल, पाटील , चाबूक यांनी सहभाग घेतला.परिसरातील वाहतूक शिस्त कायम ठेवण्यासाठी आणि नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या तपासण्या सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:16 pm, September 20, 2026
34°C
छितरे हुए बादल
40 %
9 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 44%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!