नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धुळ्यात एफडीएची धडक कारवाई: ८७ हजारांचा मक्याचा स्टार्च जप्त, ११.३२ लाखांचा अवैध गुटखा पकडला

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी कैलास माळी 

धुळे: अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या दृष्टीने विविध आस्थापनांवर धडक कारवाई केली आहे.

​या मोहिमेअंतर्गत शिरपूर येथील ‘मे. रतलाम इंटरप्राईजेस’ (बालाजी नगर, मांडळ शिवार) या दुकानाची तपासणी करण्यात आली. तेथून ‘स्टार्च मक्का’ या अन्नपदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले असून संशयावरून ७२५ किलो साठा (किंमत रु. ८७,०००/-) जप्त करण्यात आला आहे.

हाडाखेड चेक पोस्टवर ११.३२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

दुसऱ्या एका कारवाईत, इंदूरकडून पुण्याकडे अशोक लेलँड वाहनातून (क्रमांक NL-01-AF-1275) प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार सांगवी (ता. शिरपूर) येथील हाडाखेड चेक पोस्टवर वाहनाची तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्रात बंदी असलेला पानमसाला, गुटखा आणि तंबाखूचे १२७५ पॅकेट्स आढळले.

​या कारवाईत एकूण ११,३२,६०० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वाहन चालक नाझीर माजीद (रा. मेवात, ता. नूह, हरियाणा) याच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाणे सांगवी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशासनाची संयुक्त कारवाई

अन्न व औषध विभागाचे नाशिक सह-आयुक्त मंगेश माने, सहाय्यक आयुक्त (अन्न) गो. वी. माहोरे, अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:15 pm, September 20, 2026
34°C
छितरे हुए बादल
40 %
9 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 44%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!