🚨DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम 🚨
धुळे :- दि. १ जुलै : एसएसव्हीबीएस’ किड्डू प्ले स्कूल, धुळे येथे राष्ट्रीय डॉक्टर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टरांविषयी आदराची भावना निर्माण करणे आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सौ. पुनम पाटील उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. डॉक्टरांची भीती बाळगू नये, कारण डॉक्टर हे समाजाच्या आरोग्याची जबाबदारी पार पाडणारे सेवाभावी व्यक्तिमत्त्व आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच नियमितपणे नखे कापणे, केस स्वच्छ व नीट ठेवणे, हात धुणे आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे हे निरोगी जीवनासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयेश गाळणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपण डॉक्टरांचा तसेच आपल्या ज्येष्ठांचा नेहमी आदर केला पाहिजे. आपण आजारी पडलो की डॉक्टर आपल्या ज्ञान, कौशल्य आणि सेवाभावामुळे आपल्याला पुन्हा निरोगी जीवन जगण्यास मदत करतात.”
हा कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी गाळणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. पूजा शर्मा, सौ. पुष्पा बाविस्कर, सौ. सुरभी दमाडे, सौ. अनुजा अमृतकर आणि सौ. प्रियंका क्षीरसागर यांनी परिश्रमपूर्वक यशस्वीरीत्या आयोजित केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्री. सुनील गाळणकर तसेच डॉ. सौ. विद्या गाळणकर यांनी मुख्याध्यापिका व संपूर्ण शाळेच्या शिक्षकवृंदाचे अभिनंदन करून कौतुक केले.



