नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात १ कोटी ५५ लाखांचा अपहार; चार कर्मचाऱ्यांना अटक

🚨DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी फहीम शहा 

धुळे: पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे येथील चार लोकसेवकांनी संगनमत करून शासनाची १ कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आरोपींची नावे:

१. मनोजगिर जगदिशगिर बुवा (कनिष्ठ श्रेणी लिपिक)

२. जगदीश देविदास सोनवणे (कनिष्ठ श्रेणी लिपिक)

३. नरेशगिर सुरेशगिर गोसावी (असिस्टंट सब-इन्स्पेक्टर – एएसआय)

४. मनोज अशोक खोंडे (पोलीस हेड कॉन्स्टेबल)

घटना काय आहे?

माहे डिसेंबर २०२४ ते एप्रिल २०२६ या कालावधीत, वेतनात कोणत्याही प्रकारचे ‘बेसिक एरियर्स’ देय नसतानाही, आरोपींनी ऑनलाइन ‘सेवार्थ’ प्रणालीमध्ये परस्पर बदल केले. त्यांनी ‘बेसिक एरियर्स’ या हेडखाली तब्बल १,५५,००,००० रुपये (१ कोटी ५५ लाख) एवढी रक्कम वाढवून ती स्वतःच्या पगार बँक खात्यात वळती करून घेतली.

शासकीय रकमेचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी १ जुलै २०२६ रोजी धुळे शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर १ जुलै रोजी रात्री ११:५२ वाजता या चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तपास: या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक विश्वजीत जाधव करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:39 am, September 5, 2026
33°C
छितरे हुए बादल
45 %
25 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Clouds: 25%
Visibility: 10 km
Sunrise: 6:15 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!