नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई: ५.९८ लाखांच्या दारूसाठ्यासह चारचाकी वाहन जप्त; दोन आरोपी ताब्यात

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी सुरजीतसिंग बाठ

गडचिरोली: जिल्ह्यात अवैधरित्या चालणाऱ्या दारू विक्री आणि वाहतुकीविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी आपली कठोर मोहीम अधिक तीव्र केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) गडचिरोली आणि उपपोलीस स्टेशन रेपनपल्ली यांनी संयुक्तपणे केलेल्या धडक कारवाईत अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी दारूसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन असा एकूण ₹५,९८,३००/- चा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मौजा रेपनपल्ली परिसर परिसरातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारूची वाहतूक केली जाणार होती. या माहितीची तात्काळ दखल घेत स्थानिक गुन्हे शाखा व रेपनपल्ली पोलीस पथकाने संयुक्तपणे मौजा रेपनपल्ली येथे नाकाबंदी करून सापळा रचला.

संशयित चारचाकी वाहन त्या परिसरात आले असता, पोलिसांनी तातडीने ते रोखून वाहनाची झडती घेतली. यावेळी वाहनात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूचा साठा आढळून आला.

महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल

पोलीस पथकाने घटनास्थळावरून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातील अवैध दारू आणि वाहतुकीचे चारचाकी वाहन असा ५ लाख ९८ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील सखोल तपास पोलीस करत आहेत.

“गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्री, निर्मिती आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई अशीच तीव्र गतीने सुरू राहील. बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.”

— गडचिरोली पोलीस दल

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:54 am, July 30, 2026
26°C
घनघोर बादल
82 %
22 Km/h
Wind Gust: 39 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:03 am
Sunset: 7:10 pm
Translate »
error: Content is protected !!