नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरज शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सलून दुकान फोडणारा चोर जेरबंद, चोरीचा मुद्देमाल जप्त

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी-राजेंद्र पवार 

 

मिरज :- मिरज शहर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावत सलून दुकान फोडणाऱ्या एका सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेला ११,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. २६२/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५(ए), ३३१(४) अन्वये हा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

फिर्यादी संतोष परसराम काळे (वय ४०) यांच्या स्टेशन रोडवरील एपी बेकरीसमोरील पी. के. जेन्ट्स पार्लर या सलून दुकानाचे कुलूप फोडून अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश केला. दुकानातील ३२ इंची एलईडी टीव्ही, होम थिएटर तसेच दोन हेअर ट्रिमर मशीन असा एकूण ११,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शब्बीर पिरवाबा फकीर (वय २४, रा. ख्वाजा वस्ती, मिरज) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या घरातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगुले, पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:13 pm, September 20, 2026
31°C
छितरे हुए बादल
51 %
15 Km/h
Wind Gust: 21 Km/h
Clouds: 42%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!