नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

करवीर पोलिसांची कारवाई; ६३,८४० रुपयांची गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त, दोघांवर गुन्हा

🚨DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी – नारायण कांबळे

 

कोल्हापूर :- करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मांढरे (ता. करवीर) येथे छापा टाकून अवैधरित्या गोवा बनावटीची विदेशी दारू विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत ६३ हजार ८४० रुपयांची गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त करण्यात आली.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्हे शोध पथकाने विजय मारुती पोवार यांच्या जनावरांच्या गोठ्यावर पाळत ठेवली. त्यावेळी सर्जेराव सखाराम जगताप (वय ४०, रा. मांढरे) हा गोवा बनावटीची विदेशी दारू विक्री करताना आढळून आला. छापा टाकून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यातून ६३,८४० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.

चौकशीत सर्जेराव जगताप व विजय मारुती पोवार (वय ३९, रा. माळवाडी, मांढरे) हे दोघे मिळून बेकायदेशीर दारू विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विजय तळसकर करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल ,अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासो पवार , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, तसेच गुन्हे शोध पथकातील सुभाष सरवडेकर, सोमराज पाटील, विजय पाटील, अमोल चव्हाण, रणजित पाटील व प्रकाश कांबळे यांनी केले

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:06 am, July 19, 2026
29°C
घनघोर बादल
59 %
13 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!