🚨DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी अकिल शहा
साक्री : सोशल मीडिया व सार्वजनिक व्यासपीठांवर इस्लाम धर्म, मुस्लिम समाज व हजरत मोहम्मद (स.) यांच्याविषयी आक्षेपार्ह, चिथावणीखोर वक्तव्ये करून धार्मिक भावना दुखावणे, समाजात तेढ व द्वेष निर्माण करणे आणि कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपी नाजिया इलाही खान हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ (BNS) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कठोर कायदेशीर कारवाई (FIR) करुन अटक करा असे निवेदन निजामपुर जैताणे येथील मुस्लीम समाजाने निजामपुर पोलीस स्टेशनचे सपोनि यांना दिले याबाबत निवेदनात म्हटले आहे की,
निजामपूर जैताणे ता. साक्री, जि.धुळे येथील मुस्लिम समाज शांतताप्रिय नागरिक असून अत्यंत वेदना, संताप आणि दुःखाने हे कायदेशीर निवेदन सादर करीत आहोतः
नाजिया इलाही खान’ नावाच्या महिलेने सोशल मीडिया (फेसबुक, युट्यूब, एक्स/द्विटर) तसेच विविध सार्वजनिक व्यासपीठांवर इस्लाम धर्म, मुस्लिम समाज आणि आमचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या हजरत मोहम्मद (स.) यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह, अपमानास्पद, निंदनीय आणि चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. सदर व्यक्तीच्या या कृत्यामुळे आमच्या धार्मिक भावना गंभीरपणे दुखावल्या गेल्या असून, मुस्लिम समाजामध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कायदेशीर तरतुदी आणि गुन्हा (भारतीय न्याय संहिता – BNS, २०२३) : सदर कृत्य हे केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसून, समाजात जाणीवपूर्वक अशांतता पसरवण्याचा आणि धार्मिक सलोखा बिघडवण्याचा पूर्वनियोजित
कट आहे. या कृत्यामुळे भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita BNS), २०२३ अंतर्गत खालील कलमांनुसार गुन्हा घडलेला स्पष्ट दिसून येतोः
माननीय सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यांमध्ये (उदा. तहसीन पूनावाला वि. भारत सरकार व इतर निर्णय) स्पष्ट निर्देश दिले आहेत की, जात, धर्म, वंश, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर समाजात द्वेष पसरवणारी भाषणे (Hate Speech) करणाऱ्यांवर पोलिसांनी तात्काळ आणि कडक कारवाई केली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सामाजिक सलोखा आणि संविधानाने दिलेल्या समानतेच्या तत्त्वाचा भंग करण्याचा अधिकार नाही. संशयित आरोपीचे कृत्य हे सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशांचे थेट उल्लंघन आहे.
त्यामुळे आमची आपणास नम्र परंतु ठाम विनंती आहे की, या प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेऊन संशयित आरोपी ‘नाजिया इलाही खान’ हिच्या सोशल मीडियावरील पोस्ट, व्हिडिओ आणि भाषणांची सखोल चौकशी करावी. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील वरील कलमांनुसार तात्काळ प्रथम खबरी अहवाल (FIR) नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
हे निवेदन कोणत्याही वैयक्तिक द्वेषातून नसून, देशातील धार्मिक सलोखा, शांतता आणि कायद्याचे राज्य अबाधित राखण्यासाठी सादर केले आहे निजामपुर जैताणे मुस्लीम समाजाची मागणी आहे की आरोपीला अटक करुन कारवाई करण्यात यावी.



