🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी साईनाथ खंडेराय
नांदेड :- बिलोली शहराच्या जडणघडणीत आणि सामाजिक एकोप्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या बिलोली नगर परिषदेच्या गणरायाच्या स्थापनेला आज तब्बल 59 वर्षे पूर्ण झाली आहेत.
====================
इ.स. 1967 – इतिहासाची सुरुवात
====================
आजपासून 59 वर्षांपूर्वी, म्हणजेच 1967 साली, बिलोली नगर परिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष कै. शिवाजीराव पाटील खंडेराय आणि तत्कालीन मुख्याधिकारी श्री. अब्दुल रहमान सर यांच्या शुभहस्ते नगर परिषदेच्या प्रांगणात श्री गणरायाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती.
====================
एका हिंदू नगराध्यक्ष आणि एका मुस्लिम मुख्याधिकाऱ्याच्या हस्ते झालेली ही स्थापना हेच बिलोलीच्या सर्वधर्म समभाव आणि एकोप्याचे प्रतीक आहे.
===================
ही परंपरा आजपर्यंत अविरतपणे चालू ठेवण्यासाठी अनेक कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी आपले योगदान दिले. यामध्ये लक्ष्मण फालके, यादव बळवंतकर, यादव मेघमाळे, पांडुरंग उपलवार, मादप्पा नागप्पा, पिराजी गादगे, अमजद बेग, मोईन पैलवान, प्रभू भालके, हनुमंत सूर्यवंशी, नरसिंग सुरगलोड, गंगाधर कलमुरगे, गोविंद कुलकर्णी, बालाजी मालेगावकर, संग्रामसिंग चव्हाण यांच्यासह भागनबाई, विठाबाई, लक्ष्मीबाई, मरुबाई, राहूबाई, जिजाबाई, राधाबाई यांसारख्या महिला कर्मचाऱ्यांचाही सिंहाचा वाटा आहे.
आजची पिढी – तीच श्रद्धा
आज घडीला नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. संतोष कुलकर्णी आणि मुख्याधिकारी श्री. कल्पेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. अनुप अर्जुनराव अंकुशकर उपनगराध्यक्ष, श्री. तुम्मोड नागनाथ पिराजी गट नेता, श्री. इनामदार मिर्झा वसीम बेग बाबु पाशु बेग, सौ. खान मैमुनाबेगम अमजेदखान, सौ. कुलकर्णी मैथिली संतोष, सौ. शिंदे लता गंगाधरराव, श्री. खंडेराय स्वप्नील खंडेराय, सौ. शंखपाळे स्वाती मनोज, श्री. अब्दुल फिरदोस अब्दुल खयुम, श्री. गादगे यशवंत लालजी, सौ. मेडेकर गिरजाबाई वसंत, श्री. कडके राजु माधव, सौ. पटेल अपसरीबेगम सादिक, सौ. पोवाडे आम्रपाली प्रकाश, श्री. कटारे संदीप रघुनाथ, श्री. गायकवाड शिवाजी पिराजी, सौ. आर्शिया नाज वलिओद्दीन फारुखी, सौ. गायकवाड अनुपमा महेंद्र, श्री. देशमुख कार्लेकर शिवशंकर बाबूराव, सौ. पुपलवार गोदावरी गंगाधर, स्वी. स.श्री. अखिल मोहमद खलील मोहम्मद, स्वी. स.श्री बिलोलीकर उमेश वसंतराव, नगरपरिषद कर्मचारी विनायक जाधव, शुभम देशमुख, शुभम पिनलवार, सचिन तोटलवार, विजय इंगळे, सुदेश बळवंतकर, गणेश फालके, नागनाथ आप्पा, जगन्नाथ मेगमाळे, लाईक सिद्दिकी, बालाजी कानोरे, भीम कुडके, धर्मराज जाधव, अनिल देवे, अक्षय जेठे, निळकंठ निर्मळे, प्रशांत वन्नाळे, फैजल सय्यद, साईनाथ मधलवाड, सुनील देवकर यांसारख्या आजच्या कर्मचाऱ्यांनी ही 59 वर्षांची परंपरा त्याच श्रद्धेने आणि उत्साहाने कायम ठेवली आहे.
59 वर्षांपासून हा गणराया बिलोली नगर परिषदेचा आणि बिलोलीकरांचा विघ्नहर्ता म्हणून आशीर्वाद देत आहे. या परंपरेचा वारसा असाच पुढे चालत राहो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना.



