🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी साईनाथ खंडेराय
नांदेड:- कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे एपीआय ज्ञानेश्वर शिंदे हे केवळ पोलीस अधिकारी नसून कुंडलवाडीसाठी देवदूत ठरत आहेत.
*बाभळी नदीवर आत्महत्येस गेलेल्या अनेकांना दिले जीवनदान*
बाभळी येथील गोदावरी नदीवर कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या अनेक महिला, तरुण व तरुणींना वेळीच शोधून त्यांनी वाचवले. त्यांना पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल न करता त्यांचे मन परिवर्तन करून समुपदेशन केले आणि त्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबात सुखरूपपणे पाठवले. त्यांच्या या धाडसी कार्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहेत.
*’एक गाव एक गणपती व डीजे मुक्त’ – 18 गावांत आदर्श निर्माण*
यावर्षी गणेशोत्सवात त्यांनी ग्रामीण भागात एक नवा आदर्श निर्माण केला. गावागावात होणारे वाद आणि अनावश्यक खर्च टाळण्यासाठी त्यांनी *’एक गाव एक गणपती व डीजे मुक्त गणेशोत्सव’* ही संकल्पना राबवली.
त्यांच्या या आवाहनाला ग्रामीण भागातील तब्बल *18 गावांनी* प्रतिसाद दिला. या 18 गावांमध्ये एकाच ठिकाणी गावचा एकच गणपती बसवून, डीजे ला फाटा देत पारंपरिक ढोल-ताशा आणि भजनात अत्यंत शांततेत आणि एकोप्याने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार.
*पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान*
या उत्कृष्ट आणि सामाजिक कार्याची दखल घेत नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. डॉ नीलभ रोहन सर आणि जिल्हाधिकारी मा. राहुल कर्डिले सर यांच्या हस्ते या 18 गावांच्या गणेश मंडळांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान खऱ्या अर्थाने एपीआय ज्ञानेश्वर शिंदे यांच्या कार्याचा गौरव आहे.
याशिवाय शहरातील लापता मुली व महिलांचा शोध, चुकीच्या मार्गावरील तरुणांना योग्य मार्गावर आणणे, तसेच गेल्या वर्षभरापासून सर्व सण-उत्सव शांततेत पार पाडणे यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल कमालीचा विश्वास निर्माण झाला आहे.
नागरिकांच्या मनात ते पोलीस कर्मचारी नसून घरातील एक सदस्य आहेत, त्यामुळेच कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे ते खरे हिरे ठरत आहेत.



