DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी – संजय दिंडे कोल्हापूर
कोल्हापूर – शहरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सोमवारी (दि. २२ जून २०२६) केलेल्या कारवाईत बेकायदेशीररित्या दोन तलवारी व गावठी हातभट्टीची दारू बाळगणाऱ्या एक इसम जोशी गल्ली विक्रम नगर परिसरात तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये तलवारी लपवून ठेवल्याची माहिती दिली.
पोलीसांनी केलेल्या झडतीत दोन तलवारी तसेच २० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण सुमारे ३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी कृष्णा प्रकाश महाले (वय ३९, रा. जोशी गल्ली, विक्रम नगर, कोल्हापूर) याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन व गुन्हे शोध पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.



