नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शहापूरमध्ये बंद घर फोडून ६० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा.

DPT NEWS NETWORK 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी – नारायण कांबळे

 

इचलकरंजी शहापूर (ता. हातकणंगले) : येथील सावली सोसायटीमधील बंद घर फोडून सुमारे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप पितांबर शिंदे (वय ४२, रा. सावली सोसायटी, शहापूर .ता. हातकणंगले) यांनी तक्रार दिली आहे. १६ जून २०२६ रोजी रात्री ८.३० ते ३० जून २०२६ रोजी दुपारी २ या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेली अंदाजे ४ ते ५ ग्रॅम वजनाची, सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लंपास केली.

फिर्यादी यांच्या तक्रारीवरून शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड , पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार तसेच पोलीस उपनिरीक्षक दरेकर यांनी भेट दिली. गुन्ह्याची नोंद सहाय्यक फौजदार मोहीते यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:03 pm, September 20, 2026
30°C
टूटे हुए बादल
57 %
10 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Clouds: 79%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!