🚨DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी – संजय दिंडे कोल्हापूर
कोल्हापूर :- कोल्हापूर शहरातील एका नामांकित बिल्डरकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागून त्यांचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी निलेश सुरेश जाधव (वय ३२, रा. मोरे माने नगर, कोल्हापूर) यांचा बिल्डरचा व्यवसाय आहे. मोरे माने नगर येथील त्यांच्या ‘सोनी हाईट्स’ या बांधकाम साईटवर काम सुरू असताना आरोपींनी त्यांच्याकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागितली.अपहरण करून खोलीत डांबले, दिनांक २९/०४/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास, आरोपी लखन माने याने फिर्यादी जाधव यांना त्यांच्याच गाडीतून जबरदस्तीने कावळा नाका येथे नेले. तेथून त्याचे साथीदार संजय किरणगे (मायाभाई) आणि लाला शेट यांनी फिर्यादीला रुईकर कॉलनी येथील अजित तिवडे याच्या ‘अजित ट्रेडर्स’ नावाच्या ऑफिसमधील एका खोलीत जबरदस्तीने कोंडून ठेवले आणि १ कोटी रुपयांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली.
धमक्या आणि काम बंद पाडले
त्यानंतरही ६ जून आणि ८ जून २०२६ रोजी आरोपी फय्याज नगराजी आणि संजय किरणगे यांनी फिर्यादीच्या ऑफिसमध्ये घुसून, तसेच त्यांच्या पत्नीसोबत असताना वारंवार धमकावून पैशांची मागणी केली. आरोपींनी बांधकाम साईटवरील कामगारांना शिवीगाळ करत “आमचा विषय मिटवल्याशिवाय काम सुरू करायचे नाही” अशी धमकी देऊन बांधकाम बंद पाडले.
या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर निलेश जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिले नंतर अजित भगवान तिवडे (रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर), फय्याज इसाक नगराजी (रा. चव्हाण कॉलनी, साळोखेनगर, कोल्हापूर)लखन बाळासाहेब माने (रा. उचगांव, ता. करवीर), संजय महाविर किरणगे उर्फ मायाभाई (रा. मनेरमाळा, उचगांव)लाला शेट व इतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०८(२), १४०(३), १३८, ३३३, ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण लोंढे करत आहेत.



