नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

इचलकरंजीत खंडणीसाठी टोळीचा राडा कोयत्याचा धाक दाखवत वाहनांची तोडफोड, परिसरात दहशत

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी – निवास गागडे

इचलकरंजी:- वस्त्रनगरी इचलकरंजीमध्ये खंडणीच्या वादातून एका टोळीने भरवस्तीत दहशत माजवत मारहाण आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी मुख्य संशयित उमेश आरबोळे याच्यासह त्याच्या ९ साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दोन टप्प्यात घडली. १२ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११ च्या सुमारास महासत्ता चौक परिसरात फिर्यादी दिगंबर माने राहणार मंगळवार पेठ हे थांबले असताना आरोपी उमेश आरबोळे (रा. गावभाग) याने आपल्या साथीदारांसह फिर्यादीला गाठले. यावेळी त्यांनी ४० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने टोळक्याने त्यांना बेदम मारहाण केली.दुसऱ्या दिवशी पुन्हा हल्ला आणि तोडफोड खंडणीचा राग मनात धरून १३ एप्रिल रोजी रात्री ९:५० च्या सुमारास या टोळीने पुन्हा आपला मोर्चा फिर्यादीच्या घराकडे वळवला. मंगळवार पेठ, ताराबाई रोडवरील रेणुका मंदिराजवळ आरोपींनी हातात कोयत्यासारखी घातक शस्त्रे घेऊन दहशत निर्माण केली. यावेळी घराबाहेर लावलेल्या मोटारसायकलची तोडफोड करण्यात आली आणि परिसरात दगडफेक करण्यात आली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले होते.याप्रकरणी उमेश आरबोळे ,ओंकार कदम (गांधी चौक), योगेश बडोदेकर (सुतार गल्ली), मोहन जमादार (पाटील मळा), वैभव कोरवी (जनता बँक परिसर), शिवराज उर्फ प्रेम चनविरे (मुजावर गल्ली), अभि मंत्री, औसणार काजवे आणि राजिल गवंडी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचे बंदी आदेश लागू असतानाही या टोळीने शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण केल्याने कायद्याचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. पोलीस नाईक महेश पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद घेतली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक माने या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:59 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
30 %
21 Km/h
Wind Gust: 41 Km/h
Clouds: 81%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!