DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी निवास गागडे
इचलकरंजी : १४ एप्रिल रोजी भारताचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचा संदेश देणाऱ्या बाबासाहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत समाजासाठी महान कार्य उभारले. “शिका, संघटित व्हा व संघर्ष करा” तसेच “शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे” या त्यांच्या विचारांनी समाजाला दिशा दिली. भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी त्यांनी घेतलेले अथक परिश्रम आज प्रत्येक नागरिकाला समान हक्क व मतदानाचा अधिकार देणारे ठरले आहेत.
याच महान विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने इचलकरंजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भव्य आणि आलिशान मंडप उभारून रवी रजपुते सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी रजपुते व धनाजी डोईफोडे युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष धनाजी डोईफोडे यांच्या वतीने समाजसेवेचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. महामानवाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व भीमसैनिकांसाठी थंडगार उसाच्या रसाचे वाटप करण्यात आले. तसेच बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वाटप करून त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमास इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेशरावजी हाळवणकर, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील, महापौर उदय धातुंडे तसेच उपमहापौर अनिल डाळ्या यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व उपस्थितांना उसाच्या रसाचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थी, डॉक्टर, शिक्षक, पोलीस व ट्राफिक पोलीस कर्मचारी, शासकीय अधिकारी, आजी-माजी नगरसेवक, सफाई कर्मचारी तसेच पत्रकार बांधव यांना पुष्प देऊन जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा हा उपक्रम विशेष ठरला.
यावेळी धनाजी डोईफोडे युवा मंचचे पदाधिकारी गणेश जाधव, रोहित रजपूत, निवास गागडे, अमित ठाणेकर, अमित पाडळे, संकेत जाधव, सुजल गुरसाळे, मनोज साळुंखे, मामा जाधव,बाळासाहेब देशमुख, विजय राजापुरे, दत्ता मांजरे,डॉ. संगेवार, प्रकाश केंगार, राजू भडंगे, अब्बास तेली, अमृत मामा भोसले, विलास गाताडे, सुहास जांभळे, शिवाजी शिंदे, प्रकाश मोरबाळे, मारुती पाथरवाट, दिलीप मुथा, भाऊसाहेब आवळे, श्रीकांत कांबळे, रविदत्त गागडे, मुकुंद गागडे, मुन्ना भाट, सन्नी गागडे व इतर भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर समाजात घडवून आणत समाजसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम रवी रजपुते सोशल फाउंडेशन व धनाजी डोईफोडे युवा मंच यांची इचलकरंजीत विशेष चर्चेचा विषय ठरला.



