नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मंचर पोलिसांनी केले एका सराईत गुन्हेगाराला एका वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- मनोहर गोरगल्ले

पुणे:- मंचर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जुना चांडोली रोड येथे राहणारा सराईत गुन्हेगार पवन सुधीर थोरात (वय २५ वर्षे) याला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

पवन थोरात याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, मारामारी, अवैध वाळूउपसा व अवैध शस्त्र बाळगणे यांसारखे एकूण १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही त्याच्यावर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई झाली असून, वेळोवेळी अटक व जामिनानंतरही त्याच्या वागण्यात सुधारणा झालेली नव्हती.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीच्या गुन्हेगारी वर्तनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्याला कायद्याच्या चौकटीत ठेवण्यासाठी मंचर पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक मा. संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.

त्यानुसार, दिनांक ९ जून २०२५ रोजी मा. जिल्हाधिकारी पुणे यांनी पवन थोरात याच्या एक वर्षाच्या स्थानबद्धतेचे आदेश जारी केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात हलवले आहे.

गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर

मंचर पोलिस स्टेशनच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणीही कायदा हातात घेतल्यास किंवा दहशतीचं वातावरण निर्माण केल्यास अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

या कार्यवाहीत पो. नि. श्रीकांत कंकाळ, पो. नि. अविनाश शिळीमकर (स्थानीय गुन्हे शाखा), स.पो.नि. सुनिल बडगुजर, पो.उ.नि. यशवंत यादव, स.पो.उ.नि. राजेश नलावडे, तसेच अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश होता.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:50 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!