DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे
कोल्हापूर :- दिनांक 31/08/2023 रोजी कोल्हापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वनरक्षक व वनपाल यांना वीस हजाराची लाच घेताना रंगेहात ताब्यात घेतले.
तक्रारदार यांचा जळाऊ लाकडांचा खरेदी विक्रीचा व्यापार असून तक्रारदार हे जत, सांगली, सांगोला, सोलापूर येथून जळावू लाकूड खरेदी करून ते भाड्याने घेतलेल्या गाड्यांमध्ये भरून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तसेच इचलकरंजी येथे आणतात आल्यानंतर त्या भाड्याने घेतलेल्या गाड्या मधील लाकडाची तपासणी न करण्यासाठी तसेच त्या वाहनातील जळावू लाकडांच्या वाहतूक परवान्यावर कारवाई न करण्यासाठी तसेच त्या गाड्यावर कोणतीही कारवाई न करणेसाठी वनरक्षक मोहन देसाई यांनी वनपाल रॉकी देसाई यांच्यासाठी व स्वतःसाठी तक्रारदार यांचेकडे 20,000/ रू. लाचेची मागणी केली तसेच वनपाल रॉकी देसाई यांनी वनरक्षक मोहन देसाई यांचेकडे लाच देण्यास सहमती देवून सदरची लाच रक्कम घेण्याकरीता वनरक्षक यांना प्रोत्साहन दिले, म्हणून वनरक्षक यांनी तक्रारदार यांचेकडून 20,000/-₹ लाच रक्कम स्वतः स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहात कोल्हापूर प्रतिबंधक विभागाने पकडले असून आरोपीतांच्या विरुद्ध हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
सदर आरोपींचे नावे हुद्धा व पत्ता खालील प्रमाणे
आलोसे 1) रॉकी केतन देसाई पद – वनपाल. वर्ग 02. नेमणूक _ प्रभारी परिमंडळ वनाधिकारी कार्यालय, हातकणंगले (वनविभाग प्रादेशिक) रा.बाचणी ता.कागल जि. कोल्हापूर व 2) मोहन आत्माराम देसाई,पद – वनरक्षक वर्ग 03 नेमणूक _ हातकणंगले परिमंडळ वनाधिकारी कार्यालय, हातकणंगले. रा.सुलोचना पार्क, प्लॉट नं.14, ए वार्ड, नवीन वाशीनाका, कोल्हापूर, मुळ रा.कडगाव, ता. भुदरगड जि. कोल्हापूर
सदर कारवाई सरदार नाळे. पोलीस उप अधीक्षक. सोबत बापू साळुंके, पोलीस निरीक्षक, संजीव बंबरगेकर, श्रेणी पोसई
पोहेकॉ 983/ विकास माने, पोहेकॉ 1480/ सुनिल घोसाळकर, पोना 2061/ सचिन पाटील, पोकॉ/ 2363 /संदीप पवार, पोकॉ/ 2608/ उदय पाटील,चापोहेकॉ 713/ विष्णू गुरव. ला.प्र.वि.कोल्हापूर यांच्या पथकाने केली असून कारवाईस खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
➡मार्गदर्शन अधिकारी :-
1)मा. श्री अमोल तांबे,पोलीस अधीक्षक लाप्रवि,पुणे. (मोबा.9922100712)
2) मा. श्रीमती शितल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवी पुणे (मोबा.9921810357)
3)मा.श्री. विजय चौधरी,अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे. (मोबा. 9607323232)