नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराने पुन्हा दहशत निर्माण करण्याचा केला होता प्रयत्न…

पोलिसांनी पाठलाग करत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी कमरेखाली घातली गोळी..

*पांगरी शिवारात सिनेस्टाईल थरार, सराईत गुन्हेगार प्रभाकर हंबर्डेवर पोलिसांनी झाडल्या गोळ्या..!*

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय

नांदेड :- मोक्कांतर्गत कारागृहात स्थानबद्ध असलेल्या विष्णुपुरी येथील सराईत गुन्हेगार प्रभाकर शंकरराव हंबर्डे याने जामिनावर बाहेर येताच आपल्या मित्राचा १८ मे रोजी खंजरने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला. याच प्रकरणात ग्रामीण पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असताना ३ जून रोजी तो विष्णुपुरी परिसरात आला असल्याची माहिती मिळाली. नांदेड ग्रामीण पोलीस आपल्या मार्गावर असल्याची माहिती मिळताच त्याने दुचाकीवर पांगरी शिवाराकडे पळ काढला. पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवला असताना त्याने पांगरी शिवारातील कॅनॉल रोडवर दुचाकी फेकून तो जंगलात पळाला. पोलिसांनीही त्याचा पाठलाग केला असता प्रभाकर हंबर्डे याने शेवटी पोलिसावर पिस्तूल रोखले. पिस्तूल रोखताच नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या कमरेखाली गोळी झाडल्या आणि तो जागीच कोसळला. हा थरार पांगरी शिवारात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:10 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!