DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- राजेंद्र पवार
मिरज:- दि. 10 जुलै 2025 रोजी सकाळी 8.30 ते 9.00 वाजण्याच्या सुमारास मालगाव गावच्या हद्दीत तानंग-मालगाव रोडवरील कॅनॉल पुलावर खूनाची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गु.र.नं. 378/2025 अन्वये BNS कलम 103(1), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची हकिकत : शास्त्रीनगर, मालगाव येथील बहादूर चाँद देसाई (मयत) यांनी घटनास्थळी अनोळखी दोन व्यक्तींना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. आरोपींनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर, मयत बहादूर देसाई यांनी ब्लेडने वार करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी बहादूर देसाई यांना शिवीगाळ केली व लाथा-बुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण करून त्यांचा मृत्यू घडवून आणला. गुन्ह्याची नोंद : फिर्यादीचे नाव : संजय जगन झोडगे, सपोफौ, मिरज ग्रामीण पो.ठा. आरोपी : दोन अनोळखी इसम (अटक प्रक्रियेत)
गुन्हा घडलेले ठिकाण : तानंग – मालगाव रोडवरील कॅनॉलचा पूल, मालगाव हद्दीत घटना घडलेली वेळ : दि. 10/07/2025 रोजी सकाळी 08.30 ते 09.00 दरम्यान
गुन्हा नोंदवलेली वेळ : संध्याकाळी 7.49 वा. घटनास्थळी भेट देणारे अधिकारी : मा. प्रणील गिल्डा (SDPO मिरज विभाग) पोनि अजित सिद (मिरज ग्रामीण) सपोनि सुनील गुरव (तपास अधिकारी) अधिक माहिती : सदर घटना ही व्यक्तिगत वादातून उद्भवलेली असून, प्राथमिक चौकशीत कोणताही संघटीत गुन्हेगारीचा किंवा राजकीय संबंध आढळून आलेला नाही. तपास सुरू असून आरोपींचा लवकरच छडा लावण्यात येईल.



