बेकायदेशीर रित्या अंमली पदार्थाची वाहतुक करणाऱ्यांवर चाळीसगाव शहर पोलीसांची कारवाई, एकुण- १४ लाख, ५७ हजार ४१६ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत, व ४ आरोपी ताब्यात.
DPT NEWS NETWORK 🗞️📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी:- अजगरभाई मुल्ला
जळगाव :- दिनांक- १७/०७/२०२५ रोजी रात्री ०१/०० वा. ते ०३/०० वाजे दरम्यान पोलीस स्टेशन हद्दीत नाकांबदी करुन संशयीत वाहनांची तपासणी करुन कारवाई करणेबाबत नियंत्रण कक्ष जळगाव यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज चौक (सिग्नल पॉईंट) येथे वरिष्ठांच्या आदेशान्वये नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यावेळी सदर ठिकाणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व अंमलदार असे नाकाबंदी करीत असतांना रात्री ०२/५० वाजेच्या सुमारास भडगाव कडुन नांदगाव कडे जाणारी एक फोर्स कंपनीची ट्रॅक्स क्रुझर पांढऱ्या रंगाची गाडी क्र. MH- १८ BX- ८९४३ आल्याने नमुद पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदरचे वाहन थांबवुन वाहन चालकास विचारपुस करुन नमुद वाहनाची तपासणी केली असता नमुद वाहनाचे सिटाखाली प्लॅस्टीकच्या थैल्या आढळुन आल्या. तेव्हा पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदरच्या प्लॅस्टीकच्या थैल्या उघडुन पाहता त्याच्यात एकुण २, ५७, ४१६ रुपये किंमतीचा ३२ किलो १७७ ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गांजा मिळुन आल्याने सदरचा गांजा हा बेकायदेशीर रित्या स्वताचे कब्जात बाळगुन वाहतुक करीत असणारे वाहनातील इसम १) राहुल पहाड्या पावरा वय-२३ वर्षे, २) अक्तारसिंग शिवदास पावरा वय- २४ वर्षे, ३) रविंद्र पंडीत पावरा वय- २० वर्षे, ४) पहाडसिंग कुमार पावरा वय- २४ वर्षे सर्व रा. महादेव दोडंवाड ता. शिरपुर जि. धुळे यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरुध्द पोकॉ/३३६३ पवन पाटील नेम- चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ३०७/२०२५ NDPS ACT- कलम २९, २० (B), ८(C) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास पोउनि / योगेश माळी हे करीत आहेत. नमुद गुन्ह्यात २, ५७, ४१६ रुपये किंमतीचा ३२ किलो १७७ग्रॅम वजनाचा व अमली पदार्थ गांजा व १२,००,०००/-रुपये किंमतीची फोर्स कंपनीची Tax Cruiser पांढऱ्या रंगाची गाडी क्र. MH- १८ BX- ८९४३ असा एकुण- १४,५७,४१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. महेश्वर रेड्डी सो, पोलीस अधिक्षक जळगाव, मा. कविता नेरकर (पवार), अप्पर पोलीस अधिक्षक सो. चाळीसगाव, मा. विनायक कोते सो. उपविभागीय पोलीस अधिक्षक चाळीसगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमीतकुमार मनेळ यांचे नेतृत्वाखाली सपोनि / भरत चौधरी, पोहेकॉ भुपेश वंजारी, पोहेकॉ/ नितिन वाल्हे, पोहेकॉ/ विनोद पाटील, पोकों/ पवन पाटील, पोकॉ/ निलेश पाटील, पोकों/प्रविण पवार, पोकॉ/ प्रथमेश पाटील, पोकॉ/ दिपक चौधरी, पोकॉ/४५८ विजय महाजन, तसेच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी केली आहे.



